(०२०) २६१३४८०६         कार्यालयीन वेळ : सोम. ते शुक्र. स. ९.४५ वा ते संध्या ६.१५ वा.

पुणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. उदयोग, माहिती तंत्रज्ञान , आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीमुळे पुणे हे राज्यात मुंबई नंतर दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. एके काळी मराठ्यांचे साम्राज्य असलेले पुणे हे समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक व शैक्षणिक वारसा लाभल्यामुळे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. देशातील अनेक नामांकित शैक्षणिक संस्था पुण्यात असून जगभरातील अनेक विद्यार्थी त्यांत शिक्षण घेत आहेत. त्यामुळेच पूर्वेकडील ऑक्सफर्ड किंवा विद्येचे माहेरघर म्हणूनही पुण्याची ओळख आहे. आज, पुण्यामध्ये जगातील नामांकित आई.टी. कंपन्याही आहेत; त्यामुळे या शहराला आई.टी. हब म्हणूनही ओळखले जाते. पुणे हे बुद्धिजीवींचे शहर आहे. पुण्यात वर्षभर संगीत, कला, साहित्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. "पुणे तेथे काय उणे" अशी उक्तीही प्रसिद्ध आहे. मनमोहक हिरवेगार डोंगर, दऱ्या, जंगल, नद्या यांनी पुणे जिल्हा नटलेला आहे.येथे आधुनिकीकरणासोबतच निसर्गाचा समतोलही साधला आहे

स्व. यशवंतराव चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली मे १९६२ मध्ये पुणे जिल्हा परिषदेची स्थापना झाली. स्व. शंकरराव दशरथराव उरसळ यांना पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होण्याचा पहिला मान मिळाला. त्यांनी दि १२/८/१९६२ ते ११/८/१९७२ पर्यत अध्यक्ष पद भूषविले. तेव्हापासून आज अखेर 22 अध्यक्ष झाले. आज रोजी १३ पंचायत समित्या व १४०७ ग्राम पंचायती ग्रामीण भागाच्या विकासासाठी कार्यरत आहेत. शासनाच्या कोणत्याही नवीन योजना, अभियान, मोहिम, राबविण्यात पुणे जिल्हा परिषद नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे. सन 2012 साली पुणे जिल्हा परिषद आय.एस.ओ. 9001-2008 प्रमाणित झालेली आहे.यशवंत पंचायत राज अभियान सन २०११-२०१२ जिल्हा स्तरावर महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे जिल्हा परिषद व्दितीय क्रमांक मानकरी ठरलेली आहे व पंचायत समिती स्तरावरील महाराष्ट्र राज्यमध्ये पंचायत समिती बारामती व्दितीय क्रमांक मानकरी ठरलेली आहे. आणि ग्रामपंचायत कांदली ता.जुन्नर गामपंचायत स्तरावरील महाराष्ट्र राज्यमध्ये तृतीय क्रमांक मानकरी ठरलेली आहे.

जिल्ह्याची लोकसंख्या :
अं.क्र. शीर्षक माहिती
१. जिल्हाची लोकसंख्या ९४,२६,२५९
२. पुरुष ४९,३६,३६२
३. स्त्रिया ४४,९०,५९७
भूगोल :

पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:”घाटमाथा”, “मावळ” आणि “देश”. पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे. पुणे जिल्हयाच्या सीमेस उत्तरेस व पूर्वेस अहमदनगर जिल्हा, आग्नेयेस सोलापूर जिल्हा, दक्षिणेला सातारा जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा तसेच वायव्येला ठाणे जिल्हा आहे.

बोलीभाषा :

प्रामुख्याने मराठी,हिंदी, इंग्रजी. परंतु सर्व भारतीय भाषा बोलल्या जातात.

नद्या :

भीमा, नीरा, इंद्रायणी, मुळा , मुठा, घोड , मीना, कुकडी, पुष्पावती, पवना, रामनदी

दळणवळण :

ऑटोरिक्षा , परिवहन व खाजगी बस, भाडेतत्वावर टॅक्सी व सायकल

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) च्या बसेस शहराच्या प्रत्येक भागामध्ये उपलब्ध आहेत. त्या सुटण्याची प्रमुख ठिकाणे – स्वारगेट, डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन , शिवाजीनगर व पुणे महानगरपालिका.

पुणे जिल्हा परिषद अंतर्गत एकुण १३ पंचायत समिती आहेत त्याअंतर्गत एकुण १३८५ ग्रामपंचायती आहेत. या सर्व पंचायत समिती व ग्रामपंचायतमध्ये शासना मार्फत देण्यात आलेल्या संगणक व प्रिंटर सुस्थितीमध्ये आहेत.

जिल्हयातील नागरी प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था

जिल्हयातील नागरी प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था खालीलप्रमाणे आहेत.

अं.क्र. तपशील संख्या नावे
महानगरपालिका पुणे महानगरपालिका व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
नगरपालिका / नगर पंचायत -
पंचायत समिती १३ हवेली, मावळ, मुळशी, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, भोर, वेल्हा, पुरंदर, खेड, जुन्नर, आंबेगाव
कॅन्टॉन्मेंट बोर्ड्स पुणे, देहूरोड, खडकी
ग्रामपंचायत १३८५