(०२०) २६१३४८०६         कार्यालयीन वेळ : सोम. ते शुक्र. स. ९.४५ वा ते संध्या ६.१५ वा.

 

केंद्र शासन पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजना

बाल्यावस्था हा मुलांच्या वाढीच्या व विकासाच्या टप्प्यातील अंत्यंत महत्वाचा कालावधी आहे. जन्माला येण्यापूर्वी तसेच जन्मानंतर बालकांना पुरेशा सेवा देण्याचे राष्ट्रीय धोरण आपल्या देशाने स्वीकारले आहे. या धोरणनुसारच 2 ऑक्टोंबर 1975 साली प्रायोगिक तत्वावर एकात्मिक बाल विकास सेवा योजना मुलांचे सर्वांगीण विकासासाठी म्हणून आरोग्य, आहार व शिक्षण एकत्रितपणे देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली. गरीब कुंटूंबातील महिला आणि मुले यांच्यासाठीचा आणि तळागाळपर्यंत पोहचलेला राज्यभरात 88,272 अंगणवाडी केंद्गे असणाराव ग्रामीण भागात 364 प्रकल्प, 85 आदिवसी प्रकल्प व 104 शहरी प्रकल्प असणारा हा सर्वात मोठा कार्यक्रम आहे.

या कार्यक्रमाखली 1) पूरक पोषण आहार, 2) लसीकरण 3)आरोग्य तपासणी 4)संदर्भ आरोग्य सेवा, 5) आरोग्य आणि सकस आहार विषयक शिक्षण 6) अनौपचारिक शालेय पुर्व शिक्षण इ. सहा महत्वाच्या सेवा दिल्या जातात. एकात्मिक बाल विकास सेवा योजना हि केंद्ग शासन पुरस्कृत योजना असून या योजनेची सुरूवात अमरावती जिल्हयातील धारणी या आदिवसी व धारावी , मुंबई या नागरी प्रकल्पाच्या स्थापने पासून महाराष्ट्र राज्यात झाली. टप्प्याटप्याने योजनेच्या प्रकलप संख्येत वाढ होऊ न राज्यातील विविध नागरी , ग्रामीण व आदिवसी प्रकल्पातून योजनेचे प्रकल्प स्थापनेत आले.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना कशासाठी ?

  1. देशाच्या मानवी साधनसंपदेचे संवर्धन करण्यासाठी. कोवळ्या बालवयातच, मुलांच्या शरीराच्या, मनाच्या आणि सामाजिक जाणीवेच्या विकासाचा
  2. भरभक्कम पाया घालण्यासाठी. बालमृत्यू, शारीरीक अपंगत्व, कुपोषण, शाळाशिक्षणात प्रगति असूनही शिक्षण अर्धवट सोडावे लागण्याची परिस्थीती आणि विकसनक्षमतेची प्रतिकूलता यांच्यामुळे उद्‌भवणारा अपव्यय
  3. टाळण्यासाठी, आणि बाल विकासाव्या क्षेत्रामध्ये जनतेचा सामूहिक सहभाग लाभावा आणि बाल विकासाच्या कार्यक्रमाला स्वयंपूर्णता प्राप्त व्हावी यादृष्टीने चालना देण्यासाठी.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे उद्देश :-

  1. 0 ते 6 वयोगटातील मुलांचा पोषण व आरोग्य दर्जा सुधारणे.
  2. मुलांचा योग्य मानसिक, शाररीक व सामाजिक विकासाचा पाया घालणे
  3. बालमृत्यूचे, बालरोगाचे, कुपोषणाचे व मध्येच शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे.
  4. बाल विकासाला चालना मिळावी म्हणून विविध विभांगांमध्ये धोरण व अंमलबजावणी
  5. याबाबत परिणामकारक समन्वय साधणे.
  6. योग्य पोषण व आरोग्य विषयक शिक्षणाद्वारे बालकांचे सर्वसामान्य आरोग्य व त्यांच्या पोषण विषयक गरजांकडे लक्ष पुरविण्याबाबत मातांची क्षमता वाढविणे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना व्याती एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत अंगणवाडी केंद्ग/ प्रकल्प कार्यन्वीत करणेसाठी आवश्यक लोकसंख्येबाबतचे निकष

पूरक पोषण आहार

अंगणवाडी केंद्गस्तरावर पूरक पोषण आहार पुरविणेत येत असलेने ग्रामीण क्षेत्रातील बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, मुलांच्या शाररीक व बौध्दिक विकास करणे व आजाराचे प्रमाण कमी करणे, रोग प्रतिकारक शक्ती वाढविणे, माता व महिलांना आहार व आरोग्य संबधिचे शिक्षण देणे इ. उद्दिष्टे साध्य होतात. 3 ते 6 वयोगटातील बालकांना पूरक पोषण आहाराव्दारे दोन वेळेस 500 कि.ग्रॅ्‌.उष्मांक आणि 12 ते 15 ग्रॅम प्रथिनेयुकत आहार स्थानिक महिला बचत गटांमार्फत मुलांना देण्यात येतो. या आहारामध्ये सकाळचा गरम नाष्टा (शेंगदाना लाडू, चिक्की, शिरा इ.) व दुपारी पूरक पोषण आहार (लापशी, उसळ, खिचडी) इ. समावेश आहे. घरी घेऊन जाण्यासाठी आहार पुरवठा. (- ) राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णय क्र. एबावि 2008/प्र.क्र.-59/का-5 दिनांक 24/08/2009 नुसार सुधारित आर्थिक निकष व सुधारित प्रमाणकानुसार 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील लाभार्थी, 6 महिने ते 6 वर्ष तीव्र कमी वजनाची बालके, गरोदर व स्तनदा माता यांनी घरी घेऊन जाण्यासाठी आहार पुरवठा करणेत येत आहे. स्वरुपातील अन्न हे विशेष पध्दतीने तयार केलेले असुन सुक्ष्म पोषक तत्वांनी युक्त अशा पद्‌ध्तीने समृध्द केलेले तसेच स्वच्छतापूर्ण वातावरणात तयार केलेले व उष्मांकयुक्त ( ) आहे. सर्व पाककृतींसाठी लाभार्थी प्रकारानुसार 25 दिवसांची (एक महिना) पॅकींग साईज, प्रति दिन प्रति लाभार्थी सर्व्हीग साईज, प्रति दिन प्रति लाभार्थी देय आर्थिक निकष, हे केंद्ग व राज्य शासनाने निश्चित केले आहेत. प्रति दिन प्रति लाभार्थ्यास द्यावयाच्या शिरा, उपमा, सत्तु व सुखडी या आहाराचे प्रमाणानुसार 25 दिवसांसाठीच्या आहाराचे पाकीटे तयार करण्यात आलेली आहेत. त्यामुळे प्रति लाभार्थीस देय असलेल्या 25 दिवसांसाठीच्या प्रमाणकानुसार खालील कोष्टकाप्रमाणे लाभार्थीना आहाराचे पाकीटे देण्यात येतात.

लसीकरण

बालकांचे आरोग्य व पोषण यांचा धनिष्ठ संबंध आहे. बालकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करून त्यांचे आरोगय चांगले ठेवणेचे दृष्टीने एकात्मिक बाल विकास सेवा योजना व आरोग्य विभाग यांचे समन्वयाने 6 वर्षाखालील सर्व बालकांना वयानुसार सहा बालरोगांपासून संरक्षण करण्यासाठी डांग्या खोकला, घटसर्प, क्षयरोग, पोलिओ, गोवर लसी देण्यात येतात. तसेच गरोदर स्ञियांना धनुर्वातापासुन संरक्षण करण्यासाठी धनुर्वात प्रतिबंधक लस देण्यात येते.

3) आरोग्य तपासणी अंगणवाडी कार्यक्षेत्रातील सर्व गरोदर स्त्रिया, स्तनदा माता व किशोरी तसेच 0 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी वर्षातून किमान 4 वेळा आरोग्य विभागाकडून केली जाते. अंगणवाडीमार्फत 100्‌% लाभार्थीची आरोग्य तपासणी होणेसाठी पाठपुरावा करणेत येतो. प्रत्येक अंगणवाडी केंद्गामार्फत प्राप्त मेडिकल किटमधून लाभार्थींस प्राथमिक औषोधोपचार केले जातात.

4) संदर्भ आरोग्य सेवा ग्रामीण भागातील लाभर्थींची आरोग्य तपासणी झाल्यानंतर गंभीर स्वरुपाचे आजार असल्यास अशा महिला व बालकांना सविस्तर सेवेकरिता ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात पाठविले जाते. तथापि अंगणवाडी केंद्गामार्फत संदर्भ सेवा देणेत येते. रुग्ण, बालके/ महिलांना संदर्भ सेवेद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्ग/ ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती करण्यात येते. ज्यांचे पालक औषधे खरेदी करण्याकरिता पैसे नसल्याने उपचार घेण्याचे टाळतात, अशा करीता प्राथमिक आरोग्य केंद्गातून औषधी पुरविण्यास निधी उभारणे तसेच ग्रामस्थांकडुन मदत घेऊन औषधे उपलब्ध करून देण्यासाठी अंगणवाडीमार्फत प्रयत्न करणेत येतात.

5) आरोग्य आणि सकस आहार विषयक शिक्षण

15 ते 45 वर्षे वयोगटातील स्त्रिया, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता व किशोरवयीन मुलींना बालकांचा विकास साधण्याचे दृष्टीने पोषण आहार व आरोग्य विषयक शिक्षण दिले जाते. यासाठी आंगणवाडी स्तरावर नियमितपणे गृहभेटी देऊन तसेच महिला मंडळांच्या सभा/ स्वयंसहाय्यता गटाच्या सभा, गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांच्या तपासणीचे वेळी उपकेंद्गामध्ये, बालकांची वजने घेण्याचे दिवशी, लसीकरणाच्या दिवशी, उत्सव, जत्रा, आठवडा बाजार यावेळी माता बाल संगोपन, सकस आहार प्रात्यक्षिके, वैयक्तिक स्व्च्छता, परिसर स्वच्छता इत्यादी विषयांवर माहिती दिली जाते. 6) अनौपचारिक शालेय पुर्व शिक्षण 3 ते 6 वर्षातील बालकांचा बौद्धीक, सामाजिक, भावनिक, व शारीरीक कौशल्येही विकसित होणे आवश्यक आहे. मुलांना शाळेची ओळख व गोडी निर्माण करण्याचे दृष्टिने लहान मुलांना शाळापूर्व शिक्षण औपचारिक पद्‌ध्तीने न देता अनौपचारीक पद्धतीने देण्यात येते. निसर्गातील पाने, झाडे, फळे, फुले व स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या साहित्यामधून आनंददायी शिक्षण देणेत येते.

वध्दीसंनियंत्रण

जन्मल्यापासुन बालकाच्या शारीरिक, मानसिक व बौध्दीक विकास झपाटयाने व एका विशिष्ठ क्रमाने होत असतो. बालकांचे वजन व उंचीत होणारी वाढ ही देखील एका ठराविक प्रमाणात असते. जागतिक आरोग्य संघटनेने तयार केलेल्या बालकांच्या वाढीचे नवीन मापदंड सन 2006 नुसार बालकांच्या वृध्दीचे संनियंत्रण वृध्दी आलेखाच्या सहाय्याने वयानुसार वजन यानिर्देशांकाद्वारे केले जाते. योजनेद्वारे अगंवाडीस्तरावर दरमहा 10 ते 15 तारखे दरम्यान मुलांचे व मुलींचे वृध्दीपत्रक वेगवेगळे करुन बालकांचे वजन घेऊन त्याची नोंद वृध्दी पत्रकात घेतली जाते. बालकाच्या वाढीच्या टप्प्यात अडथळा येत असेल तर सहज लक्षात येऊन वेळेवर योग्य ती प्रतिबंधात्मक काळजी घेता येते. अति तीव्र कमी वजनाची बालके अति धोकादायक असल्यामुळे ताबडतोब वैद्यकीय उपचार व संदर्भ सेवा देण्यात येते. बालकांचे वजन घटण्यास व वाढ न होण्यास कारणभूत असणा-या अनेक कारणांची , आजारांची माहिती शोधून (उदा.डायरिया,श्वसन,जंतुसंसर्ग ,अपुरा आहार,आईचे आजारपण इ.) त्यानुसार वेळेवर सुधारात्मक उपचार करणे सहज शक्य होते. बालकांना दयावयाचा पुरेसा आहार, आरोग्याची काळजी तसेच त्यांच्या वृध्दी व विकासासंबंधी मातांचे व कुटुंबातील सदस्यांचे समुदेशन करणे या गोष्टी प्रभावीपणे करणेस मदत होते.

नाविन्यपूर्ण उपक्रम -- ग्राम बाल विकास केंद्ग (ॄ) कुपोषणाच्या समस्येवर मात करणेसाठी शासनाने गेल्या काही वर्षात विविध उपाययोजना केल्या आहेत. पुरक पोषण आणि आरोग्य सेवा या दोन्ही एकत्रितपणे आणि समन्वयाने पुरविल्या तरच हा प्रश्न सोडविता येतो. कुपोषण निर्मूलन व बालमृत्यू कमी करण्यासाठी 'ग्राम बाल विकास केंद्ग'योजना राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. महिला बाल विकास अंतर्गत 'एकात्मिक बाल विकास सेवा योजना 'आणि सार्वजनिक विभागाअंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान यांचे समन्वयाने ग्राम बाल विकास केंद्गामार्फत 6 वर्षाखालील तीव्र कुपोषित () व मध्यम कुपोषित (ं) बालकांचे एकात्मिक व्यवस्थापन करण्यात येते . ग्राम बाल विकास केंद्गामध्ये गावातील 6 महि­ने ते 6 वर्षे वयोगटातील कुपोषित बालकां­ना दाखल करणेत येत आहे. एक महि­न्याच्या कालावधीमध्ये सदर बालकान­ा गांव पातळीवरील ग्राम बाल विकासे केंद्गातील आहार संहितेचा वापर करु­न त्या बालकांच्या श्रेणीत सुधार करणेचे प्रयत्न करणेत येत आहेत. बालकान­ा दररोज सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत केंद्गात दाखल करणेत येऊन पोषणाबाबत काळजी घेतली जाते. बालकांना दररोज नियमितपणे आहार व औषधे देणेत येतात. ग्राम बाल विकास केंद्गामुळे पालकाची दवाखा­न्यात ये-जा करण्याची अडचण दुर होते, मातांना आहार व आरोग्याविषयी मार्गदर्शन मिळते तसेच गावातील इतर ग्रामस्थ दिल्या जाणा-या आहाराची माहिती घेवू­न सक्षम होणेस मदत होते. या केंद्गांना संबंधीत गावांतील ग्राम पंचायती व ग्रामस्थांचेही चांगल्याप्रकारे सहकार्य मिळत आहे. ग्राम बाल विकास केंद्गाचा प्रति बालक प्रतिदिन खर्च रु .32/- शासनाने निर्धारित केलेला असुन केंद्गाची किरकोळ डागडुजी , सुशोभीकरण , बाळकोपरा इ. एका वेळचा रु. 400/- खर्च करणेस परवानगी देणेत आलेली आहे. सदरच्या केंद्गास संबंधीत गावांतील ग्राम पंचायती व ग्रामस्थांचेही चांगल्याप्रकारे सहकार्य मिळत आहे तसेच काही ठिकाणी पूर्णतः लोकसहभागातू­ा ग्राम बाल विकास केंद्गे यशस्वीपणे राबविणेत आलेली आहेत. जिल्ह्यामध्ये प्रथमतः पुरंदर प्रकल्पामध्ये प्रायोगिक तत्वावर 15 अंगणवाड्यांमध्ये ग्राम बाल विकास केंद्गाची स्थाप­ना करणेत आलेली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढील प्रमाणे ग्राम बाल विकास केंद्गांची स्थापना करणेत आलेली आहे

अंगणवाडी इमारत बांधकामे

जिल्हा वार्षिक योजना सन 2009-10 अंतर्गत पुणे जिल्ह्यास 176.12 लक्ष अनुदान प्राप्त झाले होते. सन 2010-2011 अंतर्गत 1103.88 लक्ष अनुदान प्रति अंगणवाडी 4.00 लक्षप्रमाणे 401 अंगणवाडी केंद्गाना प्राप्त झाले आहे.

महिला तक्रार निवारण समिती

महाराष्ट्र शासन महिला व बाल कल्याण विभाग यांचेकडील निर्णय दिनांक 19 सप्टेंबर 2006 अन्वये शासकीय/ निमशासकीय सेवेतील महिलोआ कर्मचा-यांच्या लैंगिक लैंगिक छळाबाब समस्यांची तपासणी करण्यासाठी महिला व तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आलेली आहे. महिला तक्रार निवारण समिती सर्व पंचायत समितीस्तरांवर कार्यरत आहेत. या समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे आहे.

  1. सर्वोच्य आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कारासाठी निकष सन 2009-2010 अंगणवाडी कार्यकर्ती कामाचा तपशिल व मुल्यमापन

सन 200-10 आदर्श अंगणवाडी सेविका/मदतनिस पुरस्कार

सन 2010-2011 या वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये आदर्श कार्य असणा-या सेविका / मदतनिस यांना च्आदर्श अंगणवाडी सेविका/ मदतनिसछ पुरस्कारासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानुसार बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी सन 2009-10 या आर्थिक वर्षामध्ये उत्कृष्ट काम केलेल्या सेविका/ मदतनिसचा प्रस्ताव सादर केले आहेत. बाल विकास प्रकल्प अधिका-यांनी आपल्या प्रकल्पातून येणा-या प्रस्तावांची निकषाच्या आधारे व्यवस्थित छाननी करून प्रत्येक प्रकल्पातून एक अंगणवाडी सेविका व एक अंगणवाडी मदतनिसची शिफारस जिल्हा कक्षामध्ये केलेली आहे.

आदर्श अंगणवाडी मदतनिस पुरस्कारासाठी निकष सन 2009-2010 अंगणवाडी मदतनिस कामाचा तपशिल व मुल्यमापन

अं.क्र.योजनाकालावधीमाहिती
1 जिल्हा परिषद महिला लोकप्रतिनिधी अभ्यास सहल आदर्श तसेच अनुकरणीय योजनांच्या अंमलबजावणीचा अभ्यास करण्यासाठी राज्यातंर्गत व राज्याबाहेर अभ्यास सहल आयोजित करण्यात येते.
2 मुलींना / महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण देणे 1. विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित तालुक्याच्या बालविकास प्रकल्प अधिकारी यांचेकडे करण्यात यावा. 2. ग्रामीण भागातील रहिवाशी असल्याबाबत सरपंच यांचा दाखला जोडण्यात यावा. 3. वार्षिक उत्पन्न रु 50,000/- च्या आत असल्याबाबत तलाठी/तहसिलदार यांचा दाखला जोडण्यात यावा. 4. प्रशिक्षण शुल्काच्या 10% रक्कम स्वत: लाभार्थीने भरणे बंधकारक. 5. मान्यता प्राप्त संस्थेत प्रशिक्षण घेणे आवश्यक . 6. प्रशिक्षण कालावधी जास्तीत जास्त 1 वर्षाचा असावा. 7. लाभार्थीना प्रशिक्षण शुल्काच्या 90% रक्कम व जास्तीत जास्त रु 5000/- रक्कम आदा करणेत येईल. 8. सदर प्रशिक्षणामध्ये ब्युटीपार्लर प्रशिक्षण, केटरींग ,बेकींग अशा विशिष्ठ प्रकारच्या स्वयंपाकाचे प्रशिक्षण, शिवणकाम व फॅशन डिझायनिंग, इंग्रजी/मराठी टायपिंग ,इत्यादी.
3 महिलांसाठी समुपदेशन केंद्र चालवणे 1. कुटुंबातील मारहाण, लैंगीक व इतर त-हेने त्रासलेल्या तसेच मानसिकदृष्टया असंतुलित महिलांच्या सामाजिक, मानसशास्त्रीय,कायदेशीर समुपदेशनासाठी सदर योजना राबविणेत येते. 2. समुपदेशक व सल्लागार यांच्या मानधन व कार्यालयीन सादिल यावर खर्च करण्यात यावा. 3. समुपदेशन केंद्राला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची मान्यता असणे आवश्यक. 4. संस्थेकडे स्वत:चे फर्निचर व इतर अनावर्ती खर्चाची व्यवस्था असणे आवश्यक. 5. संस्थेला प्रति वर्षी रक्कम रुपये 25,000/- प्रमाणे अनुदान देण्यात येईल.
4 मुलींना स्वरक्षणासाठी/ ज्युडो/कराटे, तायक्वांदो योगा प्रशिक्षण देणे 1. महिला व मुलींवर होणारे अन्याय, त्यांचे लैंगिक शोषण अशा प्रकारच्या अत्याचारांना सक्षमपणे तोंड देता यावे, यासाठी सदर योजना राबविण्यात येते. 2. यासाठी इयत्ता 4 ते 10 वी पर्यंतच्या व महाविद्यालयीन मुलींना तसेच शाळेतील इच्छूक महिला शिक्षकांना ज्युडो कराटे, तायक्वांदो,योगाचे सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात यावे. 3. सदर प्रशिक्षणासाठी प्रत्येक प्रशिक्षणार्थीवर जास्तीत जास्त रु.600/-पर्यंत खर्च करण्यात यावा.
5 ५ वी ते १० वी पर्यंत शिकणाऱ्या मुलांसाठी मोफत सायकल पुरविणे निरंक
6 विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुलींचा सत्कार करणे निरंक
7 कुपोषित मुलामुलींसाठी, किशोरवयीन मुलींसाठी, गरोदर, स्तनदा माता यांना अतिरिक्त आहार पुरविणे निरंक
8 ७ वी ते १२ वी पास पर्यंत मुलींना संगणक (MSCIT) प्रशिक्षण देणे 1. लाभार्थी रत्नागिरी जिल्हयातील ग्रामीण प्रकल्पांचे कार्यक्षेत्रातील रहिवासी असावा. 2. लाभार्थी दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील असावा अथवा लाभार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रु50,000/- पेक्षा जास्त नसावे. 3. लाभार्थी इ.7 वी ते 12 वी पास महिला असावी. 4. सदर संगणक प्रशिक्षण कोर्स हा एम.एस.सी.आय.टी किंवा त्यास समकक्ष असावा. 5. लाभार्थ्याचे प्रशिक्षण हे शासनाच्या मान्यताप्राप्त संस्थेतून घेणे आवश्यक असून प्रशिक्षण अर्थसहाय्य संस्थेस आदा करण्यात येईल. 6. प्रशिक्षणाचे अर्थसहाय्य प्रति लाभार्थी रुपये 3,350/- मात्र अनुज्ञेय राहील. 7. प्रशिक्षणार्थ्याचा प्रस्ताव बालविकास प्रकल्पामार्फत येणे आवश्यक आहे. 8. विहीत नमुन्यातील अर्जासोबत 1. शाळा सोडल्याचा दाखला किंवा शाळेचे बोनाफाईड सर्टीफिकेट, 2. इ.7वी ते 12 वी उत्तीर्ण असल्याचे गुणपत्रक, 3. रहिवासी असल्याबाबत सरपंचांचा दाखला. 4.उत्पन्नाचा तहसिलदार यांचा दाखला असणे आवश्यक आहे.
9 किशोरवयीन मुलींना व महिलांना जेंडर, आरोग्य, कुटुंब नियोजन, कायदेविषयक प्रशिक्षण देणे किशोरवयीन मुलींना विकास व सक्षमीकरण व्हावे, पोषण व आरोग्य विषययक दर्जा सुधारावा, त्याचप्रमाणे स्वच्छता, प्रजनन व लैंगिक आरोग्य, विविध कायदेविषयक तरतूदींची माहिती मिळावी, म्हणून विधी तज्ञ, अनुभवी व संवेदनशील तज्ञ मार्गदर्शक यांचेमार्फत प्रशिक्षण शाळा आयोजित करण्यात याव्यात
10 अंगणवाड्याना साहित्य पुरविणे अंगणवाडयाच्या गरजेची तीव्रता पाहून उपलब्ध साहित्य वितरीत करणे. अंगणवाडी जि.प.रत्नागिरी यांचेकडील एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत ग्रामीण प्रकल्पातील शासनमान्यता प्राप्त असावी.
11 महिलांना साहित्य पुरविणे 1. लाभार्थी रत्नागिरी जिल्हयातील ग्रामीण प्रकल्प कार्यक्षेत्रातील रहिवासी महिला असावी. (सरपंचाचा दाखला जोडणेत यावा.) 2. लाभार्थी दारिद्रय रेषेखालील असावा किंवा त्याचे वार्षिक उत्पन्न रु.50,000/-व त्यापेक्षा कमी असावे. (तहसिलदार/सरपंच/विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांचा उत्पन्नाचा दाखला जोडावा). 3. लाभार्थीस वस्तूच्या किंमतीच्या 10 टक्के रक्कम या कार्यालयाकडे जमा करावी लागेल. 4. सदरचा प्रस्ताव बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचेमार्फत पाठविणे आवश्यक आहे. 5. वयाची 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक. 6. सदर लाभार्थ्याने सदरच्या योजनेचा यापूर्वी लाभ घेतलेला नसावा.
12 अंगणवाडी इमारती बक्षीसपत्राकरिता अनुदान देणे अंगणवाडी इमारत बांधकामासाठी जागा मालक आपली जागा देण्यास तयार असतात परंतु त्याचे बक्षिसपत्र करण्यासाठी कोणतेच अनुदान नसल्याने रक्कम रु.5000/- इतके अनुदान प्रत्येक बक्षिसपत्रासाठी देण्यात येईल.
13 अपंगांना साहित्य पुरवणे (घरघंटी) 1. लाभार्थी ही रत्नागिरी जिल्हयातील ग्रामीण प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी असावा.(सरपंचांचा दाखला जोडावा) 2. लाभार्थी दारिद्रय रेषेखालील असावा किंवा त्याचे वार्षिक उत्पन्न रु.50,000/- किंवा त्यापेक्षा कमी असावे. (तहसिलदार/सरपंच/विशेष कार्यकारी दंडाधिकरी यांचा उत्पन्नाचा दाखला जोडावा). 3. लाभार्थी महिला अपंग असावी. ( अपंगत्व 40 % अथवा त्यापेक्षा जास्त असलेबाबतचे जिल्हाशल्य चिकित्सक यांचेकडील प्रमाणपत्र जोडण्यात यावे.) 4. या योजनेतून कमाल रु.20,000/- फक्त इतक्या रकमेच्या मर्यादेत अनुदान मंजूर करण्यात येईल. 5. लाभार्थीस वस्तूच्या किंमतीच्या 10 टक्के रक्कम या कार्यालयाकडे जमा करावी लागेल. 6. लाभार्थ्याच्या नांवे घरगुती वीज कनेक्शन असणे आवश्यक (अलिकडील वीज बील व रेशनकार्ड छायांकित प्रत जोडावी .) 7. सदरचा प्रस्ताव बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचेमार्फत पाठविणे आवश्यक आहे. 8. वयाची 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक.( वयाबाबतचा सक्षम अधिका-याकडील दाखला)
14 महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान0उद्देश - • सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षणानुसार SECC गरीब कुटुंबाचा समावेश • गरीबांच्या संस्था निर्माण करणे • शाश्वत उपजीविका निर्माण करणे • वित्तीय सेवा व शासकीय लाभ देणे • गरीबांच्या आयुष्यात समृध्दी आणणे ठळक वैशिष्ट्ये – • गरीबांच्या संस्था उभ्या करणे त्या्मध्ये महिलाचे स्वयंसहाय्यता गट / स्वयंसहाय्यता गटांचे ग्रामसंघ / ग्रामसंघांचे प्रभा्ग स्तरीसंघ प्रत्येक गरीब कुटुंबातील किमान एका महिलेचा बचत गटात सहभाग. • समुदाय संसाधन व्यक्तीमार्फ़त CRP गावपातळीवर अंमलबजावणी • प्रत्येक कुटुंबाकडे उपजीविकेचे किमान तीन स्त्रोत व वर्षा ला किमान 1 लक्ष उत्पन्न • गटांना अभियानामार्फ़त तसेच बॅका मार्फ़त आर्थिक सहाय्य • समर्पित, संवेदनशील व स्वतंत्र यंत्रणेची निर्मिती आर्थिक सहाय्य – – प्रत्येक स्वयंसहाय्यता गटांना रु. 10 ते रु.15 हजार फ़िरता निधी RF – प्रत्येक स्वयंसहाय्यता गटास रु. 60 हजार समुदागुंतवणूक निधी CIF – अति गरीब कुटुंबांसाठी ग्रामसंघास रु.75 जोखीम प्रवणता निधी VRF – ग्रामसंघास रु 75 हजार तर प्रभाग संघास रु 3 लक्ष प्रारंभिक निधी Start-up fund – बचत गटांना बॅकेचे कर्ज स्वरुपात अर्थसहाय्य Bank linking – नियमित बॅकेचे कर्ज परत फ़ेड केल्यास शुन्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध
अं.क्र.विभागप्रश्नउत्तर
1 महिला व बालकल्याण विभाग७ वी ते १० वी पास पर्यंत मुलींना संगणक प्रशिक्षण देणे या योजनेचे अर्ज कुठे प्राप्त होतात?विहित नमुन्यातील अर्ज संबंधित तालुक्याच्या बालविकास प्रकल्प अधिकारी यांचेकडे प्राप्त होतात
2 महिला व बालकल्याण विभाग७ वी ते १० वी पास पर्यंत मुलींना संगणक प्रशिक्षण देणे योजनेसाठी लाभार्थ्यांची शैक्षणिक पात्रता काय आहे?लाभार्थी इ.७वी ते १२ वी पास महिला असावी.सोबत गुणपत्रकाची सत्यप्रत आवश्यक.
3 महिला व बालकल्याण विभागमहिलांसाठी समुपदेशन केंद्र चालविणे योजनेतून कोणत्या बाबींवर खर्च केला जातो?समुपदेशन व सल्लागार यांच्या मानधन व कार्यालयीन सादिल यावर खर्च करण्यात येतो.
4 महिला व बालकल्याण विभागमहिलांसाठी समुपदेशन केंद्र चालविणे समुपदेशन केंद्राला कुणाची मान्यता लागते?समुपदेशन केंद्राला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची मान्यता असणे आवश्यक आहे.
5 महिला व बालकल्याण विभागमहिलांसाठी समुपदेशन केंद्र चालविणे समुपदेशन संस्थेकडे कशाची व्यवस्था असणे आवश्यक आहे?संस्थेकडे स्वतःचे फर्निचर व इतर अनावर्ती खर्चाची व्यवस्था असणे आवश्यक आहे.
6 महिला व बालकल्याण विभागमुलींना/महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण कुठे घेणे आवश्यक आहेप्रशिक्षण मान्यता प्राप्त संस्थेत घेणे आवश्यक आहे.
7 महिला व बालकल्याण विभागमुलींना/महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण कालावधी जास्तीत जास्त किती असावा?प्रशिक्षण कालावधी जास्तीत जास्त १ वर्षाचा असावा.
8 महिला व बालकल्याण विभागमहिला व बालकल्याण समिती सदस्यांचा अभ्यास दौऱ्यामध्ये कोणाचा सहभाग होतो?ग्रामपंचायत ,पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा सहभाग असतो.
9 महिला व बालकल्याण विभागमहिला व बालकल्याण समिती सदस्यांचा अभ्यास दौऱ्याचे आयोजन कुठे केले जाते ?अभ्यास सहलीचे राज्यांतर्गत व राज्याबाहेर आयोजन केले जाते
10 महिला व बालकल्याण विभागमुलींना/महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण अर्ज कुठे प्राप्त होतात ?विहित नमुन्यातील अर्ज संबंधित तालुक्याच्या बालविकास प्रकल्प अधिकरी यांचेकडे प्राप्त होतात
11 महिला व बालकल्याण विभागमहिलांना विविध साहित्य पुरविणे योजनेत प्रस्ताव सादर करण्यासाठी लाभार्थीचे वय किती असावे?प्रस्ताव सादर करण्यासाठी लाभार्थ्याची वयाची १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक
12 महिला व बालकल्याण विभागमहिलांसाठी समुपदेशन केंद्र चालविणे संस्थेला प्रति वर्षी किती रक्कम अनुदानापोटी दिली जाते?संस्थेला प्रति वर्षी रक्कम रुपये २५,०००/- प्रमाणे अनुदान देण्यात येते.
13 महिला व बालकल्याण विभाग७ वी ते १० वी पास पर्यंत मुलींना संगणक प्रशिक्षण देणे योजनेत संगणक प्रशिक्षण कोर्स कुठले दिले जातात?सदर संगणक प्रशिक्षण कोर्स हा एम.एस.सी.आय.टी.किंवा त्यास समकक्ष असावा
14 महिला व बालकल्याण विभाग७ वी ते १० वी पास पर्यंत मुलींना संगणक प्रशिक्षण देणे योजनेचे प्रशिक्षण कुठे घेणे आवश्यक आहे?प्रशिक्षण मान्यता प्राप्त संस्थेत घेणे आवश्यक आहे.
15 महिला व बालकल्याण विभागकिशोरवयीन मुलींना व महिलांना जेंडर,आरोग्य,कुटुंबनियोजन,कायदेविषयक प्रशिक्षण योजनेत प्रशिक्षण कुठल्या स्तरावर दिले जाते?प्रशिक्षण प्रकल्प स्तरावर दिले जाते
16 महिला व बालकल्याण विभागमहिलांसाठी समुपदेशन केंद्र चालविणे योजनेमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश आहे?कुटुंबातील मारहाण,लैंगिक व इतर तऱ्हेने त्रासलेल्या तसेच मानसिकदृष्ट्या असंतुलित महिलांच्या सामाजिक ,मानसशास्त्रीय,कायदेशीर समुपदेशनासाठी सदर योजना राबविणेत येते.
17 महिला व बालकल्याण विभाग७ वी ते १० वी पास पर्यंत मुलींना संगणक प्रशिक्षण देणे योजनेचे परिपूर्ण भरलेले अर्ज कुठे दयावेत?परिपूर्ण भरलेले अर्ज संबंधित तालुक्याच्या बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालयामध्ये जमा करावेत.
18 महिला व बालकल्याण विभाग७ वी ते १० वी पास पर्यंत मुलींना संगणक प्रशिक्षण देणे या योजनेच्या अर्जासोबत कोणकोणते दाखले जोडावेत ?१)ग्रामीण भागातील रहिवाशी असल्याबाबत सरपंच यांचा दाखला जोडण्यात यावा. २)लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील असल्यास ग्रामसेवक यांचा दाखला किंवा वार्षिक उत्पन्न रु.५०,०००/-च्या आत उत्पन्न असल्यास तलाठी /तहसिलदार यांचा दाखला जोडण्यात यावा.
19 महिला व बालकल्याण विभाग७ वी ते १० वी पास पर्यंत मुलींना संगणक प्रशिक्षण देणे योजनेत प्रशिक्षण अर्थसहाय्य कसे अदा केले जाते?प्रशिक्षण अर्थसहाय्य संबंधित संस्थेस अदा केले जाते. तसेच प्रशिक्षणाचे अर्थसहाय्य प्रति लाभार्थी शासन नियमाप्रमाणे अनुदेय राहील
20 महिला व बालकल्याण विभागमुलींना स्वसंरक्षणासाठी व त्यांच्या शारीरिक विकासासाठी प्रशिक्षण देणे योजनेमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश आहे?महिला वा मुलींवर होणारे अन्याय,त्यांचे लैंगिक शोषण अशा प्रकारच्या अत्याचारांना सक्षमपणे तोंड देता यावे,यासाठी इयत्ता ४ ते १० वी पर्यंतच्या व महाविद्यालयीन मुलींना तसेच शाळेतील इच्छुक महिला शिक्षकांना ज्युडो कराटे,योगाचे सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येते.
21 महिला व बालकल्याण विभागमुलींना स्वसंरक्षणासाठी व त्यांच्या शारीरिक विकासासाठी प्रशिक्षण देणे योजनेत प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांवर किती खर्च केला जातो?प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांवर जास्तीत जास्त रु.६००/- पर्यंत खर्च करण्यात येतो.
22 महिला व बालकल्याण विभागकिशोरवयीन मुलींना व महिलांना जेंडर,आरोग्य,कुटुंबनियोजन,कायदेविषयक प्रशिक्षण योजनेमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश आहे?किशोरवयीन मुलींना विकास व सक्षमीकरण व्हावे,पोषण वा आरोग्य विषयक दर्जा सुधारावा,त्याचप्रमाणे स्वच्छता,प्रजनन व लैंगिक आरोग्य,विविध कायदेविषयक तरतुदींची माहिती इत्यादीचा समावेश आहे.
23 महिला व बालकल्याण विभागकिशोरवयीन मुलींना व महिलांना जेंडर,आरोग्य,कुटुंबनियोजन,कायदेविषयक प्रशिक्षण योजनेत प्रशिक्षण कुणा मार्फत दिले जाते.प्रशिक्षण विधी तज्ञ,अनुभवी व संवेदनशील तज्ञ मार्गदर्शक यांचेमार्फत दिले जाते.
24 महिला व बालकल्याण विभागमहिलांना विविध साहित्य पुरविणे योजनेच्या अर्जासोबत कोणकोणते दाखले जोडावेत ?१)ग्रामीण भागातील रहिवाशी असल्याबाबत सरपंच यांचा दाखला जोडण्यात यावा. २)लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील असल्यास ग्रामसेवक यांचा दाखला किंवा वार्षिक उत्पन्न रु.५०,०००/-च्या आत उत्पन्न असल्यास तलाठी /तहसिलदार यांचा दाखला जोडण्यात यावा.
25 महिला व बालकल्याण विभागमहिलांना विविध साहित्य पुरविणे योजनेत लाभार्थीस वस्तूच्या किंमतीच्या किती टक्के रक्कम या कार्यालयाकडे जमा करावी लागेल?लाभार्थीस वस्तूच्या किंमतीच्या १० टक्के रक्कम या कार्यालयाकडे जमा करावी लागेल.
26 महिला व बालकल्याण विभाग५ वी ते १२ वी पर्यंत शिकणाऱ्या मुलींसाठी सायकल पुरविणे योजनेचे भरलेले अर्ज कुठे दयावेत?परिपूर्ण भरलेले अर्ज संबंधित तालुक्याच्या बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालयामध्ये जमा करावेत.
27 महिला व बालकल्याण विभाग५ वी ते १२ वी पर्यंत शिकणाऱ्या मुलींसाठी सायकल पुरविणे योजनेच्या अर्जासोबत कोणकोणते दाखले जोडावेत ?१)ग्रामीण भागातील रहिवाशी असल्याबाबत सरपंच यांचा दाखला जोडण्यात यावा. २)लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील असल्यास ग्रामसेवक यांचा दाखला किंवा वार्षिक उत्पन्न रु.५०,०००/-च्या आत उत्पन्न असल्यास तलाठी
28 महिला व बालकल्याण विभागमहिला व बालकल्याण समिती सदस्यांचा अभ्यास दौऱ्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो ?पंचायत राज,आदर्श गाव ,निर्मल ग्राम,महिला बळकटीकरण,महिला व विकासचे उपक्रम इत्यादी विषयांची अभ्यास पूर्ण माहिती घेतली जाते
29 महिला व बालकल्याण विभागमुलींना/महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण परिपूर्ण भरलेले अर्ज कुठे दयावेत ?परिपूर्ण भरलेले अर्ज संबंधित तालुक्याच्या बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालयामध्ये जमा करावेत
30 महिला व बालकल्याण विभाग५ वी ते १२ वी पर्यंत शिकणाऱ्या मुलींसाठी सायकल पुरविणे योजनेचे अर्ज कुठे प्राप्त होतात?विहित नमुन्यातील अर्ज संबंधित तालुक्याच्या बालविकास प्रकल्प अधिकारी यांचेकडे प्राप्त होतात.
31 महिला व बालकल्याण विभागबालवाडी व अंगणवाडी सेविका,मदतनीस, पर्यवेक्षिका यांना पुरस्कार देणे योजनेचे निकष काय आहेत?प्रमाणपत्र,पुष्प व महिला बालकल्याण समिती मध्ये ठरविण्यात येईल त्या ठोक रक्कमेचा धनादेश.
32 महिला व बालकल्याण विभागमहिलांना विविध साहित्य पुरविणे योजनेचे अर्ज कुठे प्राप्त होतात?विहित नमुन्यातील अर्ज संबंधित तालुक्याच्या बालविकास प्रकल्प अधिकारी यांचेकडे प्राप्त होतात.
33 महिला व बालकल्याण विभागमहिलांना विविध साहित्य पुरविणे योजनेचे परिपूर्ण भरलेले अर्ज कुठे दयावेत?परिपूर्ण भरलेले अर्ज संबंधित तालुक्याच्या बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालयामध्ये जमा करावेत.
34 महिला व बालकल्याण विभागमुलींना/महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण अर्जासोबत कोणकोणते दाखले जोडावेत ?१)ग्रामीण भागातील रहिवाशी असल्याबाबत सरपंच यांचा दाखला जोडण्यात यावा. २)लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील असल्यास ग्रामसेवक यांचा दाखला किंवा वार्षिक उत्पन्न रु.५०,०००/-च्या आत उत्पन्न असल्यास तलाठी /तहसिलदार यांचा दाखला जोडण्यात यावा.
35 महिला व बालकल्याण विभागमुलींना/महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षणशुल्काच्या किती टक्के रक्कम स्वतः लाभार्थीने भरणे बंधनकारक आहे ?प्रशिक्षण शुल्काच्या १० टक्के रक्कम स्वतः लाभार्थींने भरणे बंधनकारक आहे.
36 महिला व बालकल्याण विभागमुलींना/महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण लाभार्थींना प्रशिक्षण शुल्काच्या किती रक्कम आदा करणेत येते?लाभार्थींना प्रशिक्षण शुल्काच्या ९०% रक्कम व जास्तीत जास्त र.रु ५०००/- आदा करणेत येते.
37 महिला व बालकल्याण विभागमुलींना/महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षणामध्ये कोणकोणत्या विषयांचा समावेश आहे?प्रशिक्षणामध्ये व्यक्तिमत्व विकास,ब्युटीपार्लर प्रशिक्षण,केटरिंग,बेकिंग अशा विशिष्ठ प्रकारच्या स्वयंपाकाचे प्रशिक्षण ,दुग्धजन्य पदार्धाचे उत्पादन, फुड प्रोसेसिंग,शिवणकाम व फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण,संगणक दुरुस्ती,मोटार ड्रायव्हिंग,इंग्रजी/मराठी टायपिंग,इमिटेशन ज्वेलरी मेकिंग,लघुलेखन,सेल्स गर्ल,विमा एजंट,परीचारका(नर्स) प्रशिक्षण,इत्यादी.चा समावेश होतो.
38 महिला व बालकल्याण विभाग५ वी ते १२ वी पर्यंत शिकणाऱ्या मुलींसाठी सायकल पुरविणे योजनेचे लाभार्थी निश्चित करणेसाठी निकष कोणते?लाभार्थी इ.५ ते १० वी पर्यंत शिकणारी मुलगी असावी. (लाभार्थ्याचे घर ते शाळेमधील अंतराकरिता शाळा व्यवस्थापन समिती प्रमुख/मुख्याध्यापक यांचे अर्जावर प्रमाणपत्र नमूद करणेत यावे.)
39 महिला व बालकल्याण विभागविशेष प्राविण्य मिळवलेल्या मुलींचा सत्कार करणे योजनेचे लाभार्थी निश्चित करणेसाठी निकष कोणते?१.लाभार्थी रत्नागिरी जिल्यातील रहवासी असावा. २.लाभार्थीने चालू आर्थिक वर्षामध्ये राज्य स्तर किंवा त्यापेक्षा उच्च स्तरावर क्रीडा,कला शिक्षण,अशा विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेले असावे. व त्याबाबतच्या प्रमाणपत्राची सत्यप्रत प्रस्तावासोबत सादर करावी.
40 महिला व बालकल्याण विभागविशेष प्राविण्य मिळवलेल्या मुलींचा सत्कार करणे योजनेत बालवाडी व अंगणवाडीमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका,मदतनीस,पर्यवेक्षिका यांना आदर्श पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.प्रमाणपत्र ,पुष्प व महिला बालकल्याण समिती मध्ये ठरविण्यात येईल त्या ठोक रक्कमेचा धनादेश.
माहिती उपलब्ध नाही